Pune

प्रलंबित मागण्यांसाठी इंदापूर नगरपरिषदेच्या कामगारांनी पुकारले आमरण उपोषण

प्रलंबित मागण्यांसाठी इंदापूर नगरपरिषदेच्या कामगारांनी पुकारले आमरण उपोषण

6 आणि 7 वा वेतन आयोग तात्काळ लागू करा आंदोलनकर्त्यांची मागणी

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे -इंदापूर नगरपरिषदेच्या कामगारांनी आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण पुकारले आहे. गेले पाच वर्षे सातत्त्याने प्रशासनाकडे मागणी करुन व आंदोलने करूनही शासन स्तरावर निर्णय न झाल्याने या कामगारांनी आमरण उपोषणाचा पवित्रा उगारला आहे.

इतर कामगारांप्रमणेच आंदोलन कर्त्या ५२ कर्मचाऱ्यांना सेवत नियमित करावे शिवाय आम्ही ५२ कर्मचारी सध्या पाचव्या वेतन आयोगानुसार पगार घेत आहोत. इतरांप्रमाणे आम्हांला ६ वा आणि ७ वा वेतन आयोग तात्काळ लागू करुन वेतन देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या या आंदोलन कर्त्यांनी केल्या आहेत. मात्र सदर विषय राज्य शासन स्तरावरील असून नगरपरिषद प्रशानाकडून २०१५ पासून वारंवार पाठपुरावा चालू आहे. कर्मचा-यांच्या असणाऱ्या विविध मागण्या शासनाने निर्णय दिल्याशिवाय त्यावर कोणताही निर्णय घेता येणार नाही असे मुख्याधिकारी डाॅ.प्रदीप ठेंगल यांनी म्हटल आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button